न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२३) :- स्वप्नलोक डेव्हलपर्स या गृहप्रकल्पाच्या चौघा जणांनी फिर्यादी यांना डेव्हलपमेंट चार्जेसचा हिशोब दिला नाही. सोसायटी स्थापन करुन दिली नाही. सोसायटी स्थापन करण्या अगोदरचे कॉमन लाईट बिल, पाणीपट्टी बिल भरले नाही. सोसायटीचे अभिहस्तांतरण करुन दिले नाही, माहीती पुस्तकात दिलेल्या अॅमेनीटीस दिल्या नाहीत. सर्व सभासदांना पार्कीग दिले नाही. तसेच सर्व सभासदांना पार्कीग न देता सर्वाच्या टॅक्स पावतीवरती पार्कीग दिल्याची नोंद करुन फिर्यादी यांची फसवणुक करुन त्यांनी दिलेल्या पैशाचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार दि.२६/१२/२०१५ पासुन आजपर्यत स्वप्नलोक हौसींग सोसायटी, दक्षीण लक्षमी नगर, मोशी येथे घडला. फिर्यादी ईश्वर भगवान रासकर (चेअरमन -स्वप्नलोक सोसायटी) यांनी आरोपी १) तुलीप प्रॉपर्टीज, मोरवाडी, पिंपरी), २) अक्रम झाहील उल्ला चौधरी, ३) भरत लालाराम चौधरी, ४) बाबुलाल पुनाराम चौधरी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी ठाण्यात पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ६३९/२०२३ भा.दं. वि. कलम ४०६,४२०,४६७,४६८,४७१,३४ महा ओनरशिप अॅक्ट (मोफा) चेकलम ३,४,५, ७,१०,११, सह १३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि आंगज पुढील तपास करीत आहेत.