न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२३) :- अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंदिराच्या पुजेसाठी श्री मंगल अक्षता कलशाचे स्वागत आकुर्डीतील श्री तुळजाभवानी मंदिर येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात भव्य मिरवणुकीद्वारे करण्यात आले.
स्वागत मिरवणुकीचे संयोजन अजित काळभोर, अभय नरवडे, पवन शेखावत, नितीन कुऱ्हाडे, जयवंत तितर, रोहन सावंत, मयूर काळभोर, प्रतीक काळभोर, निखिल काळभोर, ओंकार देसले, प्रवीण गोगावले, अमन यादव, सोमदत्त काळभोर यांनी केले.
मंगल अक्षता कलश मंगळवार संध्याकाळपर्यंत मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. श्री तुळजामाता मित्र मंडळ व श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट यांनी सहकार्य केले.














