न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२३) :- कोरीयन तरुणी व्हिडीओ बनवित असताना आरोपीने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले. तीच्याजवळ येवुन तीला चिकटुन त्याने डावा हात सदर तरुणीच्या गळ्यात टाकुन तीला त्याच्याजवळ ओढुन पुन्हा तीच्या खांद्यावर हात ठेवुन तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन करताना व्हिडीओमध्ये दिसुन आले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.०५/११/२०२३ ते १६/११/२०२३) सकाळी ११:०० वा ते १२:०० च्या सुमारास भोंडवे कॉर्नर जवळ, फळ मार्केट, रॉयल कासा सोसायटी चौक, संत तुकाराम ब्रिजचे जवळ, रावेत येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी भरत करणराव उंचाळे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी ४१५/२०२३ भा.द.वी. कलम ३५४, २९४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोउपनि पन्हाळे पुढील तपास करीत आहेत.