न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२३) :- मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकावर अमेटी युनिर्व्हसिटी आणि मडप बोगदा, तसेच खालापूर पथकर नाक्यादरम्यान हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.