न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२३) :- पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
दोनवेळा नोटीस बजावूनही त्याला साधे उत्तरही देण्यात आलेले नाही, अशा ५४२ जणांनी पुढील २४ तासांत निवडणूक कामासाठी हजर न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दिला. हे ५४२ अधिकारी, कर्मचारी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील आहेत.