- स्थानिक नागरिकांचं वाहतूक पोलिस उपायुक्त बापू बांगर यांना साकड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२३) :- गेल्या काही दिवसांपूर्वी तळवडे परिसरात वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन नागरिकांचा बळी गेला, तर दोघेजण जखमी झाले. या अपघातानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. वाहतूक कोंडी व वाढते अपघात रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी परिसराची पाहणी करून तळवडे ग्रामस्थांची बैठक घेतली. वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी उपायुक्तांकडे तळवडे चौकात असलेला बस थांबा चौकापासून इतर ठिकाणी स्थलांतरित करणे. तळवडे चौकात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण कर्मचारी नियुक्त करणे. अवजड वाहनांना प्रवेश बंदी करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे. रस्त्याचे डांबरीकरण करून आवश्यक असलेल्या ठिकाणी गतिरोधक निर्माण करणे. रस्ता दुभाजकांमधील अनावश्यक वळणमार्ग बंद करणे. चौकात झेब्रा क्रॉसिंग पट्टे पुन्हा रंगविणे व नियम न पाहणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई करणे विविध मुद्दे उपस्थित केले.
दरम्यान तळवडे परिसरातील वाढती लोकसंख्या, उद्योग व अरुंद रस्ते यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. अपघात होतात. त्यामुळे महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाच्या समन्वयाने या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.














