- पाण्याचे तुषार हवेत सोडून प्रदूषण कमी केले जाते; महापालिकेचा दावा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरातील दुषित हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध १७ चौकात एअर प्यूरिफिकेशन फाउंटन उभारण्यात येत आहेत. त्या यंत्राद्वारे पाण्याचे तुषार हवेत सोडून हवेतील प्रदूषण कमी केले जाते. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातील एक फाउंटन आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात उभारण्यात आला आहे.
दिल्ली शहराच्या धर्तीवर महापालिका ही नवी संकल्पना शहरात राबवित आहे. वायू व जल प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (एन- सीएपी) शहरातील १७ चौकांत १२ मिस्ट टाईप वॉटर फाउंटन आणि ९ विकामी एअर प्युरिफीकेमान फाउंटन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लग्न समारंभात प्रवेशद्वारावर सुगंधी द्रव्य फवारले जाते. त्याप्रमाणे या फाउंटनचे काम असणार आहे. दर दहा मिनिटांनी या फाउंटनद्वारे तुषार उडविले जातात. त्यामुळे हवेतील धुळीकाण जड होऊन खाली बसतात.
पाणीपुरवठा करण्यासाठी त्याखाली ५०० ते १ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या कामासाठी ३ कोटी ९० लाखांचा खर्च अपेक्षित
आहे. हा निधी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाने दिला आहे. एआर प्यूरिफीकेशन उभारण्याचे काम शहरात अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, मुव्हेंबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशनची ५ वाहनेही आहेत. पाण्याच्या टैंकरप्रमाणे असलेली ती पाच वाहने रस्त्यांवर फिरून पाण्याचे तुषार उडवित आहेत. तसेच, मोशी कचरा डेपोतील बांधकाम राडारोडा प्रकल्पात एक कोटी खर्च करून डस्ट सप्रेशन यंत्रणा बसविली जाणार आहे.
वातावरणात तरंगणारे धुळी कण श्वसनानाद्वारे फुफ्फसात जातात. त्यामुळे नागरिकांना गंभीर आजार होतात. हे धुळीचे कण पाण्याच्या तुषारामुळे पाण्यासोबत जड होऊन खाली जाऊन बसतात, त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. त्यासाठी शहरात अधिक वर्दळीच्या चौकांत एअर प्युरिफीकेशन फाउंटेन उभारण्यात येत आहेत, असे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर प्रमुख संजय कुलकर्णी यांनी सांगितले.














