- वाहतूकीचा असा असेल पर्यायी मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२३) :- कोरेगाव भीमा नजिक पेरणेफाटा (ता. हवेली) येथे येत्या एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होत आहे. विजयस्तंभास अभिवादन करण्यास मोठ्या संख्येने नागरिक जात असतात. वाहतुकीची समस्या उद्भवू नये यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकी संदर्भातील आदेश काढले आहेत.
चाकण, म्हाळुंगे, दिघी-आळंदी, देहुरोड, तळेगाव, भोसरी वाहतुक विभाग अंतर्गत येणा-या व जाणा-या परिवहन महामंडळाच्या बसेस, जड, हलकी वाहने/माल वाहतुक टेम्पो/ट्रक वाहनांकरीता या मार्गावर (दि. ३१/१२/२०२३) रोजी सायंकाळी ५.०० पासुन ते दि.०१/०१/२०२४ रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत वाहतुक वळविणेबाबत अधिसुचना प्रसिद्धीस दिली आहे.
नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) अनुयायी यांची वाहने खेरीज करून तात्पुरत्या स्वरुपात यांना मुभा आहे.
वाहतूकीचा पर्यायी मार्ग…
१. चाकण ते शिक्रापुर व शिक्रापुर ते चाकण अशी दोन्ही बाजुकडील जाणा-या च येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. (अनुयायी यांच्या वाहनांखेरीज)
२. सोलापुर रोडवरुन आळंदी चाकण या भागात येणारी जड वाहने माल वाहतुक (टेम्पो /ट्रक) ही वाहने हडपसर-मगरपट्टा-खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथुन आळंदीकडे तसेच देहुफाटा चौकात डावीकडे वळून पुढे पुणे नाशिक रोडवरुन चाकण येथे जातील.
३. मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने/माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) ही वाहने वडगाव मावळ-एचपी चौक म्हाळुंगे वासोली फाटा बिरदवडी गाव- रोहकल फाटा-पुणे नाशिक रोड- खेड- मंचर- नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.
४. मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने/माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) ही वाहने वडगाव मावळ- एचपी चौक म्हाळुंगे- वाघजाईनगर- बिरदवडी गाव- रोहकल फाटा- पुणे नाशिक रोड- खेड- मंचर- नारायणगाव-आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.
५. मुंबई येथुन अहमदनगर बाजुकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जिप इ. वडगाव मावळ- चाकण चौक खेड- पाबळ शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील.
६. आळंदी- शेल पिंपळगाव बहुळ- साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी व येणारी सार्वजनिक/खाजगी प्रवासी वाहतूक पुर्ण पणे बंदी करण्यात येत आहे. (अनुयायी यांच्या वाहनांखेरीज)
७. आळंदी -मरकळ लोणीकंदकडे जाणारी व येणारी सार्वजनिक/खाजगी प्रवासी वाहतूक पूर्ण पणे बंदी करण्यात येत आहे. (मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर ९ फुट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने तेथुन जावू शकणार नाहीत. त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)
८. मुंबईकडुन देहूरोड येथे जुन्या पुणे मुंबई हायवेने येणारी वाहतूक सेंट्रल चौकातुन निगडी – पिंपरी चिंचवडकडे न जाता सदरची वाहतूक ही सेंट्रल चौकाकडुन मुंबई बेंगलोर हायवेने सरळ वाकड नाका- चांदणी चौकातुन इच्छित स्थळी जावु शकतील. (अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)
९. मुंबई कडुन एक्सप्रेस हायवेने पुणे कडे जाणारी वाहने उसें टोलनाका येथुन मुंबई बेंगलोर हाययेने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) सरळ वाकड नाका व राधा चौक येथुन पुणेकडे जावु शकतील. (अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)