न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२३) :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगुन येथुन गौतम बुध्दांची मुर्ती आणुन ती देहुरोड बुध्दविहार येथे स्थापना केली होती. या घटनेचा ६९ वा वर्धापन (दि. २५) सोमवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनुयायी दर्शनासाठी देहूरोड येथे येतील, अशी शक्यता आहे.
दरम्यान देहुरोड ते निगडी मार्गावर वाहतुक विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांच्या वतीने (दि. २५) रोजी पहाटे ४.०० ते रात्री १२.०० पर्यंत वरील सर्व प्रकारच्या वाहनांना (अनुयायी यांची व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) प्रवेश बंदी करण्यात येत आली आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणेकरता तात्पुरते स्वरुपात आदेश (नोटिफिकेशन) निर्गमित करण्यात आले आहेत.
देहूरोड/निगडी वाहतूक विभाग अंतर्गत बदल…
१) जुना मुंबई पुणे हायवे रोडने सेंट्रल चौक देहुरोड ते भक्ती शक्तीकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदर मार्गावरील वाहने सेन्ट्रल चौकातुन उजवीकडे वळुन बेंगलोर हायवेने मुकाई चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील.
२) जुना पुणे मुंबई हायवेने भक्ती शक्ती चौक ते सेंट्रल चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदर मार्गावरील वाहने भक्ती शक्ती चौकातुन डावी कडे वळुन हँगीग ब्रिज रावेत तसेच मुकाई चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील.