मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मराठा आंदोलन प्रकरण चिघळू नये म्हणून त्वरीत निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचं राणे म्हणाले. तसंच दोन तीन दिवसात प्रकरणावर पडदा पडून परिस्थिती निवळेल अशी शक्यता देखील नारायण राणेंनी वर्तवलीय. दरम्यान, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी देखील मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन मराठा आंदोलनासंदर्भात चर्चा केली.
‘त्या’ पोलिसाच्या पाठीवर बुटाचा ठसा कुणाचा ?, हे आहे सत्य
आरक्षणवरून मराठा समाजाचा उद्रेक झालाय. आंदोलन चिघळू नये म्हणून हस्तक्षेप करण्यासाठी मी आज मुख्यमंत्र्यांना भेटलो. यात हस्तक्षेप केला जावा, सरकारने विचार करावा आणि त्वरित निर्णय घ्यावा अशी त्यांना विनंती केली असं नारायण राणे म्हणाले. दोन ते तीन दिवसात हालचाली होतील आणि यावर पडदा पडेल. पत्रकारांनी काही असे शब्द वापरू नका की आंदोलन चिघळेल असंही राणे म्हणाले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर गेले होते.
















