व्हाॅट्सअॅपवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अलीकडे व्हाॅट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि पोस्टमुळे निष्पाप लोकांचा जमावाच्या मारहाणीत बळी गेलाय. गेल्या तीन दिवसांपासून मराठा ठोक मोर्चाचे राज्यभरात आंदोलनं सुरू आहे. या आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झालाय. या पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीवर बुटाचा ठसा आहे. आणि यासोबत तुम्ही पायाने पाठीवर शाबासकी देण्यापेक्षा हाताने दिली असती तर खूप छान वाटलं असतं असा मेसेज पसरवला जात आहे. पण या फोटोची सत्यता पडताळून पाहिली असता हा फोटो फेक असल्याचं समोर आलंय.
फोटोमध्ये एक पोलीस दोन पोलीस कर्मचारी उभे आहे. एक पोलीस पाठ करून तर दुसरा पोलीस कर्मचारी त्याच्यासमोर उभा आहे. पाठ करून उभा असलेल्या पोलिसाच्या पाठीवर कुणी तरी लाथ मारल्यानंतर बुटाचा ठसा उमटला असं हे दृश्य आहे. पोलिसांवर हात उचलले म्हणजे आपल्याच रक्षकाचा अपमान करण्यासारखं आहे. मराठा मोर्च्याचा दरम्यान पोलिसाला अशा मारहाण करण्यात आली असं व्हायरल