मराठा आरक्षणासाठी पेटलेला आंदोलक आता परभणीत आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको केला आहे. परभणीच्या धर्मापुरी पाटीवर हे आंदोलन करण्यात आलं आहे. भर रस्त्यात जाळपोळ केल्यामुळे 1 तास परभणी-जिंतुर वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूकीला मार्ग देण्यासाठ पोलिसांनी रस्त्यावरील टायर हटवले आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.