न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- सुदुंबरे येथील तुलसी आंगण सोसायटी येथे दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांनी औदुंबराची मनोभावे पूजा केली.
त्यानंतर श्रीदत्ताच्या प्रतिमेला हार आणि नैवैद्य दाखविला. त्यानंतर आरती संपन्न झाली. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आशाताई लोखंडे, उषाताई सोनवणे, ज्योतीताई चव्हाण, प्रियांकाताई चव्हाण, अश्विनीताई सुरवसे, मीनाक्षीताई सुरवसे, संत संताजी जगनाडे महाराज संस्थांनचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, गोविंद चव्हाण, महेश सुरवसे, लक्ष्मण सुरवसे, आधीक पाटील, विशाल काळडोके, राहुल भगत आणि सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.