न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- सकाळच्या वेळी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करुन घरातील लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणारी तामीळनाडुची गँग जेरबंद करण्यात आली आहे. एकुण २३ गुन्हे उघड करित १४,३०,००० रु. किं. चे ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने हि कामगिरी केली.
भुमकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी या ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्यात आली. सौंदराजन गोविंदन (वय २१ वर्षे मुळ रा. नं.७५, उदयराज पालयम, पो. थोट्टलाम, मादनुर ता. अंबुर जि. वेल्लोर राज्य- तामीळनाडु), १) गुनासेकर संकर (वय २१ वर्षे) २) तामीलारसन मादेश (वय २१ वर्षे( सर्व सध्या रा. अदिनाथनगर, सुखवानीबाग, भोसरी, मुळ रा. नं.७५, उदयराज पालयम, पो. थोट्टलाम, मादनुर ता. अंबुर जि. वेल्लोर राज्य- तामीळनाडु असे अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे तामीळनाडु राज्यातून चोरी करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड परीसरात येवून वेगवेगळ्या भागांमध्ये सकाळचे वेळी फिरुन उघडे असलेले घरात प्रवेश करुन घरातील मोबाईल लॅपटॉपची चोरी करुन, त्याची तामीळनाडु राज्यात जावुन विक्री करीत होते. आरोपींनी वाकड हद्दीत तसेच पिंपरी चिंचवड मधील वेगवेगळया ठिकाणी घरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली. आरोपींकडुन हस्तगत करण्यात आलेले मोबाईल व लॅपटॉप बाबत पिंपरी चिंचवड मधील विविध पोलीस स्टेशनला एकुण २३ गुन्हे दाखल असुन आरोपींकडुन एकुण ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप सह रोख रक्कम असा एकुण १४,३०,००० रुपयांचा माल जप्त करणेत आला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि-२, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि रमेश खेडकर यांनी मिळुन केली आहे.











