न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, भोसरी येथे (दि. २४) रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये ५९३ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले, निरंकारी भक्तांबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.
वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी २७४ युनिट, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी १११ युनिट, संत निरंकारी रक्तपेढी यांनी २०८ युनिट रक्त संकलन करण्याचे कार्य केले.
शिबिराचे उद्घाटन चंद्रकांत इंदलकर सहआयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सुनील पांढरे सहआयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला महेश लांडगे आमदार, विलास लांडे मा.आमदार तसेच भोसरी परिसरातील नगरसेवक यांनी सदिच्छाभेट देऊन मिशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे आभार भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी मानले.











