न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करणार आहेत.
ठाकरे यांची भेट घेऊन लोकसभेला इच्छुक असल्याचे वाघेरे यांनी सांगितले होते. त्यांनी चर्चा करुन दोन दिवसात सांगतो असे सांगितले होते. अखेरीस वाघेरे यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचे समजते. त्यामुळे वाघेरे शनिवारी शिवबंधनात अडकणार आहेत.














