- चिखलीत बिबट्याचा मुक्तसंचार, अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 28 डिसेंबर 2023) :- खेड तालुक्यात हैदोस घातल्यानंतर बिबट्याने पिंपरी-चिंचवड शहराकडे मोर्चा वळविला आहे.

चिखलीतील देहू-आळंदी रोडवरील आशियाना बेकरी लगत
आज गुरुवारी (दि.२८) रोजी पहाटे 5:30 वाजता परीसरातील नागरिकांना बिबट्या आढळून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आजूबाजूला घिरट्या मारून हा बिबट्या शेजारील ज्वारीच्या शेतात गेल्याचे त्या व्हिडीओतुन दिसत होते.

येथील नागरिकांनी पोलीस स्टेशन तसेच महापालिका आणि वनविभागाला याची माहिती दिली. संबंधित विभागाचे कर्मचारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पकडण्याच्या तयारीला लागले. इकडून तिकडे पळ काढणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. त्याला सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.
तरीही यापुढे मॉर्निंग वॉक अथवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सावध रहावे. कारण बिबट्यांनी आता पिंपरी-चिंचवड शहराकडे मोर्चा वळविला आहे.











