न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२३) :- श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या श्री साईनाथ बालक मंदिराच्या ५२ व्या स्नेहसंमेलन चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात रविवारी (दि. २४) रोजी साजरे झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे माजी अध्यक्ष महावीर सत्याण्णा, उद्योजिका अश्विनी सत्याण्णा यावेळी माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, देवराम गावडे, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, शिक्षिका प्रतिनिधी स्वाती कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रज्ञा जोशी आणि योगिता देशपांडे यांनी यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग तसेच पालक यांच्या सहकार्याने ५२ वे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली, कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक यांनी बालचमूंच्या विविध गुणदर्शनात शब्द रंग भरले. बालक मंदिराला औदार्याने सहकार्य करणार्या व्यक्तींबद्दल प्रज्ञा पाठक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शितल कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. धामणे यांनी संस्थेच्या पुढील योजनांचा उल्लेख करत बालाचमुंना शुभाशीर्वाद दिले. कोषाध्यक्ष डॉ. प्रसाद गणपुले यांनी नवीन शैक्षणिक धोरणासाठी बालक मंदिर योग्य ती वाटचाल करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात उपाध्यक्ष प्रा. र.रा. रा बेलसरे, सेक्रेटरी निशा बेलसरे, पालक प्रतिनिधी माविनकट्टी व संपदा देशमुख यांनी मोजक्या शब्दात शाळेच्या यशाचा गौरव आपल्या भाषणातून केला.











