- तत्काळ भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२३) :- निगडीतील शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि महिलांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. एक ते दीड किलोमीटर वळसा घालून त्यांना रस्ता ओलांडून ये-जा करावी लागत आहे. कामास विलंब झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पादचारी भुयारी मार्गाच्या कामाला मुदतवाढ देऊन ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. ती मुदतवाढ (दि. ८) रोजी संपली आहे.
सद्यस्थितीत निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल व मधुकर पवळे उड्डाणपूल येथील पादचारी भुयारी मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. या पादचारी भुयारी मार्गाचे ” कै. स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप ” असे नामकरण करावे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. हॅलोजन लाईट भुयारी मार्ग बोगद्यात बसविण्यात यावेत. भुयारी मार्गाच्या बाहेरील बाजूला पांढरे पट्टे मारण्यात यावेत.
तसेच पादचारी भुयारी मार्गाचे उद्घाटन लवकरात लवकर करून हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

















