न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२३) :- ”हाच तो अमित, याला सोडु नका, कोण मधी आले तर, त्याचेकडे मी बघतो” असे म्हणत आरोपींच्या साथीदार पैकी एकाने पालघन व दुस-याने कोयता काढुन फियादी यांच्या मुलाच्या उजव्या हाताच्या दंडावर व उजव्या बरगडीवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने व पालघनने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. फियादी यांचा मुलगा अमित व त्याचे मित्र चौघेजन फिर्यादीच्या मुलाचा जुना मित्र आरोपी क्र १ याने भेटण्यासाठी बोलावले असता ते चौघेही भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी यांनी संगणमत करुन अमित यास शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान केली. त्यानंतर आरोपी मोटार सायकल वरुन पळुन गेले आहेत.
हा प्रकार (दि. २६) रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास आंबेडकर चौक, पिंपरी येथे घडला. फिर्यादी हनुमंत रघुनाथ जाधव यांनी आरोपी १) बालाजी ऊर्फ यमराज जगताप व त्याचे ८ ते १० साथीदार यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी १२४२/२०२३ भा.दं.वि कलम ३०७,३२३, ५०४,१४१, १४३,१४७, १४९, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ १) (३) सह १३५ नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि डोंब पुढील तपास करीत आहेत.













