न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२३) :- भोसरी, चिंचवड परिसरात दुचाकींची चोरी आणि दुकान फोडणा-या सराईत चोरटयास भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ०५ दुचाकींसह एकूण ३,१८,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (दि. २६) रोजी विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय २३ वर्षे रा. सध्या फिरस्ता, मुळ पत्ता चमंधा, कसिया कौशाम्बी, भरवारी, उत्तरप्रदेश) याला धावडेवस्ती, भोसरी येथून सापळा लावुन ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पोलीस तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देउन परिसरातील सीसीटिव्हीद्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण केले. चोरी करणा-या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली. आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व चिंचवड येथून चोरी केलेल्या ०५ दुचाकी काढून दिल्या. तसेच त्याने पूर्वी तो काम करीत असलेल्या भोसरी येथील एका वाईनशॉपमध्ये दोन वेळा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास चालू आहे.
पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परि. १. विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग विठठल कबडे यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, सपोनि कल्याण घाडगे, पोउपनि मुकेश मोहारे, पोलीस हवालदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, मपोहवा मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, पोलीस अंमलदार सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, मपोहवा भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.











