- नामांकित कंपनीकडून दुकानदारांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निगडीतील ट्रान्सपोर्टनगरमधील ऑटोमोबाईल्स दुकानात दोघांनी अशोक लेलंड कंपनीच्या नावाने बनावट पार्ट विक्रीसाठी ठेवले होते. त्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलमोहोर ऑटोमोबाईल्स या दुकानात आरोपीने अशोक लेलंड कंपनीचे ५८,७०० रुपये किंमतीचे बनावट क्लच प्लेटस, बनावट कंगण बेअरिंग व बनावट ब्रेक लायनर विक्रीसाठी ठेवुन त्याची विक्री केली. हा प्रकार (दि. २७) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी फिर्यादी रेवननाथ विष्णु केकान यांनी आरोपी देवप्रकाश रामखिलावन पाल याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. निगडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात ७८२/२०२३कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१,६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला सी.आर.पी.सी ४१ (अ) (१) अन्वये नोटीस दिली आहे. पोउपनि शेळके पुढील तपास करीत आहेत.
ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथील महिंद्रा मोटर पार्टस दुकानात देखील अशोक लेलंड कंपनीचे एकुण २,५०८ रुपये कि.चे लेपार्टस कंपनीचे बनावट गियर बॉक्स पॅकींग विक्रीसाठी ठेवुन त्याची विक्री करीत असताना आरोपी मिळून आला. आरोपी अरुण शामलाल मित्तल याच्या विरोधात फिर्यादी रेवननाथ विष्णु केकान यांनी फिर्याद नोंदविली आहे. निगडी पोलीस ठाण्यात ७८३/२०२३ कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१,६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सी.आर.पी.सी ४१ (अ) (१) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. पोउपनि शेळके पुढील तपास करीत आहेत.











