- सरत्या वर्षात निरोप देण्यासाठी पर्यटकनगरी सज्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार सुट्या आल्याने सरत्या वर्षात निरोप देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी लोणावळा-खंडाळ्यात होणार आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉट्स तसेच अनेक सेकंडहोम ‘हाउसफुल्ल’ झाले असून, पर्यटकांनी जल्लोष सुरू केला आहे. येथील हॉटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटनस्थळे, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडावर ‘थर्टी फर्स्ट’ पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
आस्थापनांनी आवश्यक तात्पुरते कायदेशीर परवाने घ्यावेत. विनापरवाना स्पीकर, डेक, डीजे वाजविल्यास कारवाई. हॉटेलचालकांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी, मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई. हॉटेल, रिसॉर्टमध्ये संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तूंची माहिती द्यावी. वाढत्या गर्दीच्या व्यावसायिकदारांना खबरदारी बाळगावी लागणार आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्याने पर्यटकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करावे, तसेच पर्यटकांनी जल्लोष करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहयक पोलिस अधीक्षक तथा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले.