न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- रस्त्यांवरील कमानी आणि विद्युत खांबांवरील क्युऑक्सवर जाहिराती लावण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून पालिकेचे उत्पन्न बुडणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य आहे, अशी माहिती महापालिकेचे अति. आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने दोन वर्षे कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविल्यामुळे रस्त्यांवरील जाहिरात कमानी (गॅन्ट्री) व विजेच्या खांबावरील क्युऑक्सवर अनधिकृत जाहिराती सुरू होत्या. महापालिकेला मिळू शकणारे उत्पन्नही बुडत आहे. या कामासाठी निविदा काढल्या आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून कार्यवाही सुरू झालेली आहे. यापूर्वी ही निविदा प्रक्रिया का काढली गेली नाही, याचीदेखील माहिती विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत आहे.
रस्त्यांवरील जाहिरात कमानी व विजेच्या खांबावरील क्युऑक्सबाबत निविदा प्रक्रिया राबविली नसल्याची बाब निदर्शनास आली. माहिती घेऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका…














