- होर्डींग्ज मालकासह इतरांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- मनपाच्या सार्वजनिक फुटपाथवरील मालकीचे १ रेन ट्री, १ पिंपळ, १ पेल्ट फोरम असे एकुण ३ वृक्ष जमीनीपासुन १२ ते १५ फुटावर विनापरवाना अज्ञात व्यक्तींनी येवुन साईराज पब्लीसीटीचा होर्डीग/जाहीरात फलक लोकांना दिसत नसल्याने, तो रोडने जाणारे-येणारे लोकांचे सहज नजरेस पडावा म्हणुन होर्डीग धारकांमार्फत एकुण ३ वृक्षांची तोड केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी रात्री ११.५५ च्या सुमारास नामदेव हाईटस सोसायटीचे बाजुला असलेले व बटवाल वस्तीकडे जाणा-या रोड शेजारी जुना आळंदी रोड, सस्तेवाडी, मोशी येथे घडला आहे.
पालिकेच्या सहाय्यक हॉर्टीकल्वर सुपरवायझरने साईराज होर्डीगचे मालक व अज्ञात इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ६५८/२०२३ महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम १९६४ कलम ३ (१), ४, महाराष्ट्र (नागरीक्षेत्र), झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम-२१(१) नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















