न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर भागात इराणी इसम टुरिस्ट व्हिसावर (दि. २५/०१/२०१७) रोजी देशामध्ये आला होता. त्याच्या पासपोर्टची वैधता (दि. १८/०६/२०१८) रोजी संपलेली होती.
या इसमास शुक्रवारी (दि. २९) रोजी भारत देशातुन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथुन त्याच्या इराण देशामध्ये डिपोर्ट (हद्दपार) करण्यात आले आहे. पोलिसांकडून अवैधरित्या वास्तव्य करणा-या परकिय नागरिकांचा शोध घेवुन कार्यवाही करण्यात येत आहे.
ही कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा), सतिश माने सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन लांडगे, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा २ (परकीय नागरिक नोंदणी शाखा), रामचंद्र घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे आणि परकीय नागरिक नोंदणी शाखेकडील पोलीस अंमलदार धनाजी पाटील, अक्षय घोडमारे, शरद तिखे व सांगवी पोलीस ठाणेकडील अंमलदार आर.बी. मिसे, आर.डी. साळुंके, ए आर मोराळे, एन. के. शिंगोटे, एच. एम. लंगर यांनी केली आहे.











