न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड लहूजी शक्ती सेनेत रविवारी भोसरीतील सुरज पाटोळे, विशाल भिसे, दिपक शिंदे, विलास कानडे, उमेश काळे यांच्यासह रूपाली जाधव, रेश्मा जाधव, रेखा पाटोळे, अरुणा सोनवणे, माया शिंदे, कस्तुराबाई पाटोळे, संघटनेच्या कट्टर समर्थक साजिदा अन्सारी यासह असंख्य महिला भगिनी व पुरुष बांधवांनी संघटनेत प्रवेश केला.
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. मातंग समाजासहित उपेक्षित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा दृढ संकल्प केला.
याप्रसंगी लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहर कोअर कमिटी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, शहराध्यक्षा महिला आघाडी शिला गायकवाड, भोसरी शहर उपाध्यक्षा छाया शिंदे यासह इतर महिला व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














