न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- दरवर्षी भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला ‘शौर्य दिन’ मोठया उत्साहात साजरा केला जातो. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी जनता येथे भेट देते. ह्या ऐतिहासिक दिवशी मी माझ्या पक्षाच्या वतीने त्या पाचशे शूरवीरांना अभिवादन करतो, अशी भावना आप मीडिया प्रमुख यशवंत कांबळे यांनी व्यक्त केली.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचे प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते. तेव्हापासून देशभरातील लाखो लोक भीमा कोरेगावला येऊन आपल्या पूर्वजांना अभिवादन करतात. अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही मनुवाद्यांचे मनसुबे उधळून लावू व संविधानाचे रक्षण करू, अशी भावना यशवंत कांबळे ह्यांनी मांडली.














