- चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विनामुल्य पाहण्यास उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२४) :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीवर आधारित कार्य, कर्तव्य, विकास, नव संकल्पना, शासन, प्रशासन व दूरदृष्टी नियोजनावर आधारित महाराष्ट्रातील नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहितीचे “ पंतप्रधान ते प्रधानसेवक “ नरेंद्र मोदी प्रदर्शनाचे आयोजन कलारंग सांस्कृतिक कलासंस्था पिंपरी चिंचवड यांच्या वतीने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालन येथे (दि ५ ,६, ७) जानेवारी २०२४ रोजी तीन दिवस करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी दिली.
प्रदर्शनाचे उदघाटन मा. आ. श्रीकांत भारतीय यांच्या शुभहस्ते सकाळी १०.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालन येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी शंकर जगताप शहरअध्यक्ष भाजपा पिं चिं शहर (जिल्हा), श्रीरंग बारणे खासदार मावळ लोकसभा, मा. आ. महेश लांडगे आमदार भोसरी विधानसभा, अश्विनी जगताप आमदार चिंचवड विधानसभा, उमा खापरे आमदार विधान परिषद, वर्षा डहाळे प्रभारी भाजपा पिंचिंशहर (जिल्हा), अमर साबळे माजी खासदार, सदाशिव खाडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा, सचिन पटवर्धन माजी राज्यमंत्री (दर्जा) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथील (दि १३ सप्टेंबर २०१३) ते आजपर्यंतच्या प्रकाशित बातम्यांचे वॉल पोस्टर्स व संकलित पुस्तकातून भारतीय नागरिकांपुढे प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे आणत आहोत. जवळपास १० वर्षांची माहिती मोदीजी यांची पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. “ पंतप्रधान ते प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी ” प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष तथा निमंत्रक अमित गोरखे निवडणूक प्रमुख पिंपरी विधानसभा भाजपा, प्रदर्शनाचे संयोजक नितीन चिलवंत व शिवकुमार सिंह बैस असणार आहेत.











