न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२४) :- इंगवले पाटील कंस्ट्रक्शन कंपनी या नावाने आर.एम.सी. प्लांट व डांबर प्लांटच्या पार्किंगमध्ये एकुण २५ गाड्या उभ्या होत्या. त्यापैकी ८ गाडयांच्या ८८,००० रुपये किंमतीच्या सोळा बॅट-या अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या आहेत.
हा प्रकार (दि. ०२) रोजी खडी मशीन रोड, वडमुखवडी चोविसावाडी येथे घडला. फिर्यादी सागर नानासाहेब जंजिरे यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलीस ठाण्यात ०२/२०२४ भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि ननावरे पुढील तपास करीत आहेत.











