न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२४) :- भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या जयंती दिनानिमित्त वैजनाथ शिरसाट (आम आदमी पार्टी) ह्यांच्या तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
वैजनाथ शिरसाट ह्यांनी ह्यावेळी सांगितले की, भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले ह्यांचे कार्य सूर्यापेक्षा जास्त तेजोमय आहे. सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईं फुलेंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
सावित्रीबाईं फुलें ह्या भारताची पहिली महिला शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, समाजसुधारक आणि कवीयत्री आहेत. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाच्या कार्ये त्यांनी केले, त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी वैजनाथ शिरसाट ह्यांनी केली.
ह्यावेळी वैजनाथ शिरसाट, ब्रह्मानंद जाधव, प्रकाश हगवणे, सुरेश बावनकर, सुरेश भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.











