न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२४) :- चार वर्ष वयाचा एक लाख रुपये किमतीचा घोडा देहूरोड बुध्दविहार समोरील मोकळया जागेत बांधलेला असताना अज्ञात चोरटयाने चोरी करून नेला आहे, अशी फिर्याद काळ साधु मदने यांनी नोंदविली आहे.
देहुरोड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात ०२/२०२४ भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा पवार पुढील तपास करीत आहेत.















