न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२४) :- शहरातील दोन पोलिस निरीक्षकांच्या पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. २) रात्री उशिरा देण्यात आले.
गुन्हे शाखेच्या पीसीबी/ एमओबी विभागाचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची दरोडा विरोधी पथक प्रमुख म्हणून बदली झाली. तर आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांची गुन्हे शाखेच्या पीसीबी/ एमओबी विभागात बदली झाली.











