न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२३) :- शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थक पदाधिका-यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिरूर येथील शिवसंकल्प सभेत व्यासपीठावर स्थान दिल्याने पदाधिका-यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानची सुरूवात शिरूर लोकसभा मतदारसंघापासून शनिवारी झाली.
जिल्हा प्रमुख रमेश कोंडे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले तर दुसरे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांना व्यासपीठा खाली बसविल्याने ते नाराज झाल्याची चर्चा पदाधिका-यांमध्ये सुरू झाली. तुपे यांनीही त्याबाबत पक्षाच्या काही नेत्यांकडे जाहीर नाराजी व्यक्त केली असून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या ढिसाळ नियोजनाबाबात तक्रार नोंदविली आहे.











