न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख सहा हजार ९२७ मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलांची रक्कम ३० जून २०१९ पर्यंत आगाऊ भरणा-या मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे.
यामध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकतीस ५० टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास ५० टक्के, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असणा-या मिळकतीस ५० टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणा-या मिळकतीस ५ ते १५ टक्के, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस १० टक्के, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी यासाठी ५ टक्के सामान्यकरात सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी दिली.











