न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२३) :- शिरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या गेटच्या बाहेर मोकळ्या जागेत ठेवलेले वेगवेगळ्या साईजचे एकुण ९,५५० मिटरचे काळे रंगाचे एचडीपीई पाईप अज्ञात इसमाने जाणीवपूर्वक आग लावुन पेटवुन देउन ८८,६२,७७० रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.
तसेच पाईपला लागलेल्या आगीमुळे शिरगाव ग्रामपंचायतच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे व श्री रोकडोबा मंगल कार्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागच्या भिंतीचे जळुन नुकसान झाले आहे.
फिर्यादी नागेश बाळासो घायाळ यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलीस ठाण्यात ६/२०२४ भादवी कलम ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि गाडीलकर पुढील तपास करीत आहेत.














