न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०१९) :- प्रियेसीला भेटायला आलेल्या तरुणाच्या डोक्यात हत्याराने वार करुन खून केल्याची घटना ढोरेनगर, सांगवी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
अशोक लक्ष्मण बिरादार (३२, रा. सुसगाव, मूळ- कर्नाटक) याचा खून झाला आहे. तर लक्ष्मण खुटेकर (३०, रा. ढोरेनगर, सांगवी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी गुरूबाळाप्पा बिरादार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची ओळख लक्ष्मण याच्या पत्नीशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यातून अशोक याचे तिच्या घरी येणे जाणे वाढले. हा प्रकार लक्ष्मण याच्या लक्षात आला. त्यामुळे तो चिडलेला होता. मंगळवारी रात्री अशोक हा लक्ष्मण याच्या घरी आला. त्यावेळी लक्ष्मण हा घरीच होता. त्याच्या डोक्यात अगोदरच राग होता. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा राग डोक्यात घेऊन त्याने अशोकवर हत्याराने वार करुन त्याचा खून केला. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.











