न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२४) :- आपल्या देशात संविधानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शिवसेनेने पक्षाच्या संविधानात २०१८ मध्ये बदल केले. परंतु ती घटना निवडणूक आयोगाकडे न दिल्याने विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी १९९९ ची घटना ग्राह्य धरून निकाल दिला. विधानसभेच्या अध्यक्ष यांना शिवसेनेचे मूळ संविधान मान्य आहे पण मूळ नेते मान्य नाही.
आपल्या देशात लोकशाही टिकवायची असेल आणि संविधान वाचवायचे असेल तर भाजप च्या हुकूमशाही, विरोधी पक्षांना फोडण्याच्या प्रवृत्तीचा पराभव करणे अतिशय महत्वाचे झाले आहे. आरोपीच न्यायधीशीच्या भूमिकेत बसल्यावर न्यायाची कशी आणि काय अपेक्षा ठेवणार?
आज लोकशाहीचा अंत्यसंस्कार या निकालामधून पाहायला मिळाला अशी माहिती आप पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष. चेतन बेंद्रे यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.











