न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२४) :- बांधकाम मोबदल्यापोटी “ACE ASTHA” या प्रकल्पातील बी विंग मधील ०९ सदनिका व सी विंगमधील ०२ सदनिका मे. साक्षी डेव्हलपर्स या लेटर हेडवरती नोटरी दस्तान्वये फिर्यादी व इतर भागीदार यांच्या लाभात आरोपी यांनी नोंदणी करुन दिल्या होत्या. तरी देखील या सदनिकांचे मालकी हक्क आरोपींनी स्वतःकडे आहे, असे दर्शवले.
फिर्यादी यांची पूर्वपरवानगी न घेता आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याची भासवत परस्पर दुस-या व्यक्तींना तिची विक्री केली. त्याचा मोबदलादेखील स्वीकारुन फिर्यादी व सदनिकाधारकांची एकुण रक्कम २,६६,९०,५०६ रु. ची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना सन २०१३ ते आजतागायत मौजे चोवीसावाडी, च-होली बु. येथे घडली.
फिर्यादी दिपक विनायक राहिंज यांनी आरोपी १) अनुप जमतानी, २) रविंद्र नामदे व ३) परमानंद जमतानी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलीस ठाण्यात १५ /२०२४, भादविक. ३४१,४०६, ४०९,४१७, ४२०,४२३, ४६५,४६७, ४६८,४७१, ५०४,५०६, ३४ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वपोनि पंडीत पुढील तपास करीत आहेत.











