न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासाठी ‘पे अँड पार्क’ योजना सुरू केली होती. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव असल्याने दोन वेळा ती गुंडाळण्याची नामुष्की प्रशासनावर आली. आता पुन्हा महापालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ती राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नव्या वर्षात पुन्हा नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
रस्त्यावर वाहन लावण्यास एका तासासाठी दुचाकी, रिक्षासाठी ५ रुपये, मोटारी, टेम्पोसाठी १० रुपये, मिनी बससाठी २५ रुपये, ट्रक व खासगी बससाठी १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. रात्रीच्या एका दिवसाचे व वर्षभराच्या पार्किंगसाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसार शुल्क द्यावे लागणार आहे.
आता नव्याने महापालिका स्वतः ‘पे अॅण्ड पार्क ही योजना राबवणार आहे. त्यासाठी महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अतिक्रमण कारवाईसाठी घेतलेले जवान, ठेकेदारी पद्धतीने घेतलेल्या रक्षकांच्या मदतीने याची अमंलबजावणी करण्यात येणार आहे.
– बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, बीआरटीएस विभाग…