न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२४) :- बांगलादेशी नागरिकाने कोणतीही कायदेशीर परवानगी नसतानाही भारतात गैरमार्गाने प्रवेश केला. घुसखोरी करुन खेड तालुक्यातील शिंदे गावच्या हद्दीत जी.ई. कंपनी शेजारी कंपनी करीता उभारण्यात येणारे नविन शेडच्या कामाच्या ठिकाणी वास्तव्य केलं.
सुब्रोतो सुशिल बैद्य (वय २५ वर्ष. रा. बहादुरपुर, उपजिल्हा आगैलझारा, जिल्हा बोरीसल, बांगलादेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात १८/२०२४, विदेशी व्यक्ती अधिनियम, १९४६ चे कलम १४, आणि पारपत्र ( भारतामध्ये प्रवेश) अधिनियम, १९२० चे कलम ३ (२) (अ) प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि दत्तात्रय जाधव पुढील तपास करीत आहेत.











