- आठ प्रभागांसाठी सुमारे २२०० कर्मचारी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२४) :- मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारला २० जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे. यामुळे मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मराठा समाजाच्या ‘होम टू होम’ जाऊन माहिती संकलित करण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेकडून आठ प्रभागांसाठी सुमारे २२०० कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा समाजाची माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे नोडल अधिकारी म्हणून तर उपायुक्त अविनाश शिंदे यांची सहायक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता महापालिकेकडून आठ प्रभागांसाठी सुमारे दोन हजार २०० कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार आहेत. ते कर्मचारी घरी जाऊन माहिती घेतील.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मराठा समाजाची माहिती संकलित करण्यासाठी ‘होम टू होम जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या माहितीचा अहवाल तातडीने मुख्यमंत्री कार्यालयास आठ दिवसांच्या आत देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.












