न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णा नगर ब्रांच व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ब्रांचमधील चिमुकल्याने उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये भाग घेतला होता.
यावेळी केंब्रिज इंटरनॅशनल प्री स्कूलचे चेअरमन धनंजय वर्णेकर, पिंपरी चिंचवड महापालिका सहायक आयुक्त अण्णा बोदडे, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे तसेच माजी महापौर अपर्णा डोके, सुरेश भोईर, सोनाली कुटे, अमोल काळे, नरेश टिळेकर, नम्रता जवंजाळ व स्मिता आदी उपस्थित होते.
यावेळी मुलांसोबत त्यांच्यासोबत पालकांनीही मनमुराद आनंद घेऊन स्नेहसंमेलना मध्ये एक नवचैतन्य निर्माण करून दिले होते. हिंदी मराठी इंग्रजी देशभक्तीपर गीते अशा वेगवेगळ्या गाणी सादर करण्यात आली. तसेच कृष्णानगर ब्रांचचे डायरेक्टर कीर्ती मारुती जाधव व मारुती गणपत जाधव यांनी आभार
व्यक्त केले.