- साहित्यप्रेमी युवा मंचचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांना साहित्यप्रेमी युवा मंचच्या वतीने सिनेअभिनेते अशोक शिंदे, अभिनेत्री विभावरी प्रधान आणि रीलस्टार शुभांगी गायकवाड यांच्या हस्ते नुकताच ” ग्रामरत्न ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
आयआयबीएम कॉलेज प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ, उत्कर्ष जगताप, शाहाबाज काझी, दक्षता ओर्पे, राजकीय नेते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच खोतवाडी हायस्कूलचे शिक्षक मुजावर सर, रजपूत सर, हेमगिरे सर, मगदूम सर आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना अमोल भागवत म्हणाले, ‘मागील १४ वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत ग्रामीण व शहरी भागातील अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य मी केले. बरेचसे विद्यार्थी पररदेशात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. जमेल तसे गावातदेखील सामाजिक कार्य करीत असतो. या कामाची दखल माझ्या गावाने घेतली. विशेष म्हणजे शालेय जीवनात गावातील ज्या सरांनी माझ्यावर संस्कार केले, मला शिकवून घडविले ते चंद्रशेखर समाजे सर यांच्या योगदानाबद्दल त्यांनाही माझ्यासह या सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरु आणि शिष्याचा ग्रामरत्न पुरस्काराने गौरव वाढवीला. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. त्याबद्दल गावचे आणि पत्रकार खोत यांचे मी आभार मानतो.
आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर व शिक्षक वर्ग यांनीही भागवत यांचे कौतुक केले.