न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पोलिस घटकांमध्ये अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्यानुसार पिंपरी – चिंचवड शहर पोलिस दलात देखील अंतर्गत बदल्या करण्यात येत आहेत. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील ११६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
शनिवारी (दि. १३) शहर पोलिस दलातील १२ सहाय्यक निरीक्षक आणि ४५ पोलिस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. त्यानंतर रविवारी (दि. १४) आणखी १८ सहायक पोलिस निरीक्षक आणि ४१ पोलिस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या.
जिल्ह्यात मूळ वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर राहता येणार नाही, अशा प्रकारचे निवडणूक विभागाचे आदेश आहेत. त्यामुळे कार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.