न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६३३ पदांसाठी घेण्यात आली होती. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे.
तसेच उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. पसंतीक्रमाचे पर्याय केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे आवश्यक असून, त्यासाठीची अंतिम मुदत २९ जानेवारी आहे. या मुदतीनंतर संवर्ग, पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची किंवा बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.