- उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंची कानउघडणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना पत्रकारांना लांब ठेवलं जात होतं.
गेल्या आठवड्यामध्ये पिंपरीत झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयकुमार चौबे यांना सांगूनदेखील त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकारांना नेत्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवलं जात आहे? अशी विचारणा केली. यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले.
याबाबत पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवले जात आहे? अशी विचारणा केली. बंदोबस्तामुळे तुमचे लोक पत्रकारांना पुढे येऊ देत नाहीत. पत्रकारांना पुढे येऊ दिले पाहिजे, त्यांना थांबवू नये. आता असे होणार नाही, याची काळजी घ्या. सर्व पक्षीय नेते आल्यास त्यांना त्यांचे काम करू द्या. त्यांच्याशी बोलायचे की नाही हा आमचा अधिकार आहे.












