न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२४) :- वाल्हेकरवाडीत मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास लागलेल्या आगीत पत्राशेडची दोन दुकाने जळून खाक झाली. त्यात एक लाकडाची वखार व एक ॲल्युमिनिअम दरवाजे बनविण्याचे दुकान होते. त्यात झोपलेल्या दोन सख्या भावांचा जळून जागीच मृत्यू झाला. मात्र, आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
वाल्हेकरवाडी येथील जय मल्हार कॉलनीत गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज ही लाकडाची वखार आणि विनायक ॲल्युमिनिअम प्रोफाइल डोअर मेकिंग कंपनी आहे. अग्निशमन दलाच्या संत तुकारामनगर मुख्य केंद्रातील दोन आणि प्राधिकरण, चिखली व थेरगाव उपकेंद्रातील प्रत्येकी एका बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवान, पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अन्य घरांमधील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. आगीत ललित अर्जुन चौधरी (वय २१) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३, मूळगाव राजस्थान) झोपलेले होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला.











