- शिवराजनगर, रहाटणी येथील घटना; वाकड पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२४) :- ‘तुमच्यासाठी या मंदीरात दर्शन बंद आहे, तुम्ही दर्शन घेवु शकत नाही’ असे ओळखीचा आरोपी एक हा फिर्यादीला म्हणाला. तसेच फिर्यादीच्या शर्टाची कॉलर पकडुन त्यांना खाली पाडले. त्याच्या बरोबर असलेले फिर्यादी यांचे ओळखीचे आरोपी क्र. २ ते १४ यांनी फिर्यादीला काहीएक कारण नसताना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
त्यामध्ये फिर्यादीला मुका मार लागला. तसेच उजव्या पायाच्या गुडघ्यास मार लागुन सुज आली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २२) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास क्षत्रीय घाँची समाज मंदिराजवळ, शिवराजनगर, रहाटणी येथील सब-वे जवळ घडला.
फिर्यादी प्रकाश रुपचंद सोळंकी यांनी आरोपी १) प्रकाश सरेश परिहार, २) रमेश गेहलोत, ३) भवरलाल परिहार, ४) दुर्गाराम परमार, ५) जगदिश परिहार, ६) जिवाराम परिहार, ७) मनोज भाटी, ८) मगनलाल भाटी, ९) रमेश नकुम, १०) दलपत भाटी, ११) दौलाराम परिहार, १२) प्रविण राठोड, १३) विशाल भाटी, १४) महेंद्र राठोड यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. वाकड पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात ०७८/२०२४ भा.दं.वि. कलम ३२३,५०४, ५०६,१४३, १४५,१४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.











