- पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी कस्पटे वस्तीतील जागेची मागणी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी करून शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले.
गेल्या पाच वर्षांपासून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध शाखा, पथकांसाठी हक्काची जागा मिळण्यासाठी अनेक प्रस्ताव पाठविण्यात आले. त्याला यश आले असून पोलिस आयुक्तालयाची इमारत, परिमंडळ दोन आणि तीनच्या पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी देखील या वर्षांत जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या पाच वर्षांत पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी देहू, मोशी, पिपरी येथील जागांसाठी प्रस्ताव पाठविले होते. मात्र, मंजुरी मिळत नव्हती. आता पीएमआरडीएच्या हद्दीतील कस्पटे वस्ती येथील २५ एकर जागा मागण्यात आली आहे. मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. पोलिस मुख्यालयासाठी देहू गायरान, मोशी येथील जागांचा शोध सुरू आहे.
पोलिस आयुक्तालय, मुख्यालय, उपायुक्त कार्यालय, विविध पथकांसाठी जागेची आवश्यकता आहे. या वर्षात काही जागा उपलब्ध होणार आहेत. तेथे आवश्यकतेनुसार इमारती उभारण्यात येतील.
– विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड…













